आमिरच्या ‘पीके’चा बनणार सिक्वेल, रणबीर कपूर करणार मुख्य भूमिका

pk

2014 मध्ये विधू विनोद चोप्राने (Vidhu Vinod Chopra) हिंदू अंधश्रद्धेवर हल्ला करणारा पीके सिनेमा बनवला होता. आमिर खानने (Aamir Khan) या सिनेमात परग्रहावरून आलेल्या एलियनची भूमिका साकारली होती. या सिनेमाला हिंदूंनी प्रचंड विरोध केला होता. हिंदू धर्माची बदनामी होत असल्याने सिनेमावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. असे असले तरी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता आणि कोट्यावधींची कमाई केली होती. मात्र सिनेमाने वाद निर्माण केल्याने या सिनेमाचे कधी काळी सिक्वेल येईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. पण निर्माता विधू विनोद चोप्राने आता या सिनेमाचा सिक्वेल तयार करणार असल्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर सिक्वेलमध्ये आमिर खानऐवजी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका साकारू शकतो असे म्हटले आहे. पीके सिनेमाच्या शेवटी रणबीर कपूर यानातून पृथ्वीवर उतरताना दाखवला होता.

विधू विनोद चोप्राने पीकेच्या सिक्वेलबाबत बोलताना सांगितले, सिक्वेलच्या पटकथेवर काम सुरु करण्यात आले असून पटकथा तयार होताच सिनेमाचे शूटिंग सुरु केले जाईल. पीकेमध्ये आम्ही रणबीर कपूरला पृथ्वीवर उतरताना दाखवले होते. त्यानंतर काय होते त्यावर अभिजात कथा लिहित आहे. त्याने अजून कथा लिहिलेली नाही पण जेव्हा तो कथा लिहिल तेव्हा आम्ही सिनेमाला सुरुवात करणार आहोत. आम्ही पैसे कमवण्यासाठी बॉलिवूडमध्ये आलेलो नसून आम्ही सिनेमा तयार करण्याचा व्यवसाय करीत आहोत. जर पैसे कमवणे हा आमचा उद्देश्य असता तर आम्ही आतापर्यंत 6-7 ‘मुन्नाभाई’ आणि दोन-तीन ‘पीके’ बनवले असते असेही विधूने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER