सिनेमा वेळेत पूर्ण न झाल्यास मानधन वाढवणार रणबीर कपूर

Ranbeer Kapoor

लॉक़ाऊनमुळे अनेक कलाकारांच्या नव्या सिनेमाचे शूटिंग (Movie Shooting)होऊ शकले नाही. परंतु कलाकारांना कोरोनाची (Corona)कल्पना नसल्याने त्यांनी एक-दोन वर्षांपर्यंतच्या डेट्स विविध निर्मात्यांना दिल्या होत्या. परंतु जवळ-जवळ सात आठ महिने शूटिंगच न झाल्याने या कलाकारांचे पूर्ण शेड्यूल बिघडले आहे. राजकुमार हिरानीच्या ‘संजू’ (sanju) सिनेमानंतर जवळ- जवळ दोन वर्ष रणबीरचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. सध्या तो दोन मोठ्या सिनेमात काम करीत असून काही सिनेमे त्याने साईन केले आहेत. हे सर्व सिनेमे वेळेवर पूर्ण करण्याचा निर्णय रणबीरने घेतला आहे. त्यासाठी त्याने निर्मात्यांना मुबलक डेट्स दिल्या आहेत. मात्र वेळेवर सिनेमा पूर्ण न केल्यास नंतरच्या प्रत्येक दिवसासाठी फी आकारण्याचा निर्णय रणबीरने घेतला आहे. त्याचे अगोदरचे सिनेमे रखडले असल्यानेही त्याने हा निर्णय घेतला आहे.

रणबीर आणि कॅटरीना अभिनीत अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ सिनेमा पूर्ण व्हायला तीन वर्षे लागली होती. तसेच अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ची घोषणा तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये झाली. शूटिंग फेब्रुवारी 2018 मध्ये सुरू झाले पण सिनेमा अजूनही पूर्ण झालेला नाही. खरे तर या वर्षी डिसेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज केला जाणार होता. पण कोरोनामुळे शूटिंगच करता आले नाही. आता हे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. यात रणबीरसह आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीर कपूरने (Ranbeer Kapoor)निर्मात्यांशी नव्या सिनेमाचा करार करताना त्यात एका क्लॉज जोडला आहे. या क्लॉजनुसार जे चित्रपट ठरलेल्या वेळेत पूर्ण होणार नाहीत अशा चित्रपटांसाठी वाढलेल्या प्रत्येक दिवसाचे तो ज्यादा पैसे घेणार आहे. चित्रपटाचे शूटिंग ठरलेल्या वेळेत व्हावे यासाठी त्याने असा नियम केल्याचे सांगितले जात आहे. रणबीर कपूर 6 जानेवारीपासून लव रंजन दिग्दर्शित नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 14 जानेवारीपर्यंत तो या सिनेमाचे पहिले शेड्यूल पूर्ण करणार आहे. यात त्याची नायिका श्रद्धा कपूर आहे. या सिनेमाचे शूटिंग गाझियाबाद, दिल्ली आणि नोयडात केले जाणार आहे. त्यानंतर तो 31 जानेवारीपर्यंत ‘ब्रह्मास्र’चे शूटिंग करणार असून यात तो 2 गाणी आणि काही दृश्ये पूर्ण करणार आहे. त्यानंतर नॉन स्टॉप लव रंजनच्या सिनेमाचे मेपर्यंत शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर तो ‘कबीर सिंग’ सिनेमामुळे लोकप्रिय झालेल्या संजीव रेड्डीच्या दिग्दर्शनाखाली ‘अ‍ॅनिमल’ या गँगस्टर ड्रामाचे शूटिंग सुरु करणार आहे. अगोदर या सिनेमाचे नाव डेव्हिल असे ठेवण्यात आले होते. परंतु ते नंतर बदलण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER