रणबीर कपूर करणार अवयव दान

ranbir kapoor

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेता असलेल्या रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) अन्य कलाकारांपुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे. रणबीर कपूरने 27 नोव्हेंबर रोजी असलेल्या ‘नॅशनल ऑर्गन डोनेशन डे’ च्या दिवशी अवयव दान करणार असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी बॉलिवूडमध्ये ऐर्श्वया रायने डोळे दान करण्याची घोषणा केलेली आहे. अवयव दान (Donate organs)केल्याने अनेकांचे जीव वाचू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयव दान करावे यासाठी मोहीम राबवली जाते. परंतु त्यासाठी लगेचच कोणी तयार होत नाही. मात्र कलाकारांनी अशा प्रकारे सामाजिक कार्याला हातभार लावला तर अवयव दान करणाऱ्यांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल,

27 नोव्हेंबर रोजी गांधी फाउंडेशनने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रणबीर कपूर या कार्यक्रमाचा मुख्य पाहुणा होता. या कार्यक्रमात बोलताना अचानक रणबीर कपूरने अवयव दानाची घोषणा केली. रणबीर कपूरने म्हटले, ‘मी माझे अवयव दान करण्याचा संकल्प करीत आहे. मी जर असे केले तर एकच नव्हे तर अनेक व्यक्तींच्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम होईल. खरे तर तुम्ही सगळ्यांनीही अवयव दान केले पाहिजे. यावर तुम्ही गंभीरतेने विचार करा असे आवाहनही यावेळी रणबीर कपूरने केले.

रणबीर कपूर सध्या ब्रह्मास्त्र चित्रपटात काम करीत असून आलिया भट्टसोबत तो लग्न करणार असल्याचेही म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER