
मुंबई :- अभिनेता (Actor) रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. रणबीरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून तो सध्या घरीच विलगीकरणात आहे आणि त्याची तब्येत व्यवस्थित आहे. त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांचे आभारही मानले आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. आता त्या बऱ्या झाल्या आहेत.
View this post on Instagram
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला