रणबीर कपूरला दहावीला ५६ टक्के गुण होते !

Ranbir kapoor

काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला बॉलिवुडमधील (Bollywood) नायिकांच्या शिक्षणाची माहिती दिली होती. त्या लेखात करिश्मा कपूर (Karishma Kapoor) फक्त पाचवी पास तर करीनाने (Kareena) बारावीपर्यंत शिक्षण घेतल्याचे आम्ही सांगितले होते. कपूर खानदान हे बॉलिवुडमधील सगळ्यात मोठे खानदान असल्याने या खानदानातील अन्य लोकांचे शिक्षण किती याची माहिती आम्ही आमच्या वाचकांसाठी मिळवली. तीच माहिती आम्ही आता तुमच्यापुढे ठेवत आहोत. ही माहिती वाचून पुन्हा एकदा तुमचा विश्वास बसेल की, जीवनात शिक्षणच सगळे काही नाही. तुमच्या अंगात कलागुण हवेत, परंतु येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे त्यासाठी तुमचे कुटुंबही येथेच काम करणारे असेल तर तुम्हाला संधी मिळेले आणि गुणवत्ता असेल तरच यशही मिळेल.

kapoor familyकपूर परिवाराच्या सध्याच्या पिढीत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सगळ्यात जास्त शिकलेला आहे. विशेष म्हणजे दहावीला रणबीरला फक्त ५६ टक्के गुण होते. परंतु कपूर खानदानातील कोणाहीपेक्षा त्याने मिळवलेले हे गुण सगळ्यात जास्त आहेत. अर्थात अनेक जण दहावीपर्यंतही पोहचले नव्हते. रणबीरने दहावी बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून केले. त्यानंतर एच. आर. कॉलेजमध्ये त्याने कॉमर्ससाठी प्रवेश घेतला. त्यानंतर त्याने न्यूयॉर्कला जाऊन व्हिज्युअल आर्ट्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्याने फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा कोर्स केला.

रोमँटिक हीरो म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या आणि २५ पेक्षा जास्त नव्या नायिकांचा नायक म्हणून विक्रम करणारे आणि रणबीरचे पिता ऋषी कपूर आठवी नापास आहेत. स्वतः रणबीरनेच ही माहिती दिली होती. रणबीरने सांगितले होते, ऋषी कपूर लहानपणापासूनच अभिनयाच्या क्षेत्रात होते. १८ व्या वर्षी तर ते ‘बॉबी’मधून नायक झाले. त्यापूर्वी आरकेच्या अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यामुळे शिक्षणापेक्षा अभिनयाकडेच त्यांचा जास्त ओढा होता.

करिश्मा आणि करीनाचे वडील रणधीर कपूर हे ऋषी कपूरपेक्षा एक इयत्ता जास्त शिकलेले असून ते नववी नापास आहेत. रणधीर कपूर यांनाही शिक्षणात रुची नव्हती. त्यांनाही चित्रपटसृष्टीचे आकर्षण होते आणि सतत चित्रपटांमध्ये अभिनयाचा विचार करीत असत. त्यांनीही बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे जास्त शिक्षण घेतलेच नाही.

पण कपूर खानदानाचे मूळ पुरुष पृथ्वीराज कपूर हे मात्र उच्च शिक्षित होते. पृथ्वीराज कपूर पेशावर येथील एडवर्ड कॉलेजचे पदवीधर होते. त्यांनी नंतर लॉसाठी प्रवेशही घेतला होता. एक वर्ष लॉ केल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे लक्ष दिले आणि बॉलिवूडमध्ये कपूर खानदानीचा प्रवेश झाला. काही मूक चित्रपटात काम केल्यानंतर भारतातील पहिल्या बोलपटाचा ‘आलम आरा’चा नायक म्हणून रुपेरी पडद्यावर येण्याचा बहुमान त्यांनाच मिळालेला आहे.

पृथ्वीराज कपूर यांनी उच्च शिक्षण घेतले असले तरी त्यांचा मुलगा राज कपूर यांनी मात्र उच्च शिक्षणाऐवजी चित्रपटाच्या शिक्षणावरच भर दिला. कर्नल ब्राऊन केंब्रिज स्कूल, डेहराडून आणि सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर मात्र त्यांनी चित्रपटात स्वतःला झोकून दिले.

दुसरा मुलगा शम्मी कपूरने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, वडाळा, डॉन बॉस्को स्कूल आणि न्यू इरा स्कूलमधून शम्मी कपूर यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर कॉलेजला जाण्याऐवजी त्यांनीही चित्रपटात उडी घेतली होती. याच शम्मी कपूर यांच्या याहू आरोळीवरूनच याहू मेलची निर्मिती झाली आहे.

शशी कपूर यांनी चांगले शिक्षण घ्यावे म्हणून पृथ्वीराज कपूर यांनी त्यांना डॉन बॉस्को स्कूमध्ये प्रवेश घेऊन दिला होता. परंतु घरात लाईट्स, अॅक्शन, कॅमेरा शब्द लहानपणापासून कानावर पडत असल्याने आणि फिल्मी वातावरण असल्याने त्यांनी मधूनच शिक्षण सोडून दिले आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

उच्चशिक्षित असलल्या पृथ्वीराज कपूर यांनी उभ्या केलेल्या इमल्यावरच सध्याची कपूर खानदान जगत आहे. राज कपूर यांनी स्थापन केलेल्या आरके स्टुडिओमुळे कपूर खानदानीने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. पृथ्वीराज आणि राज कपूरच्या या मेहनतीमुळेच रणबीर, करीना, करिश्माचे शिक्षण झाले नसले तरी त्यांचे अडले नाही. पैसा मात्र मिळत राहिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER