रणबीर कपूर, आलिया लग्नापूर्वी तयार करू पाहातायत नवे घर

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलिवूडमधील (Bollywood) सध्याचे सगळ्यात हॉट आणि चर्चेत असलेले लव्ह बर्डस आहेत. रणबीर कपूरचे यापूर्वीही काही अभिनेत्रींशी नाव जोडले गेले होते. त्यांच्या प्रेमाच्या चर्चाही खूप रंगल्या होत्या. मात्र ती प्रेमप्रकरणे पुढे जाऊ शकली नाहीत. मात्र रणबीर आणि आलिया सध्या पुढील भविष्याबाबत गंभीर असून ते दोघे लग्न यावर्षी लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. लग्नापूर्वीच आपल्या स्वप्नातील घर तयार करण्यात त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळेच हे दोघेही नुकतेच त्यांच्या तयार होत असलेल्या नव्या बंगल्याची पाहणी करण्यास पोहोचलेले दिसले. सोबत रणबीरची आई नीतू सिहंही होतीच म्हणा.

वांद्रे येथे स्वर्गीय अभिनेता ऋषी कपूर यांनी बंगला बांधला होता. या बंगल्याला ऋषी कपूर यांनी त्यांच्या आई-वडिलांचे म्हणजेच राज कपूर आणि कृष्णा यांचे नाव दिले होते. कृष्णाराज नावाच्या या बंगल्यात ऋषी कपूरचे कुटुंबिय राहात आलेले आहे. मात्र सध्या जागांचे वाढलेले भाव आणि प्रशस्त फ्लॅटची आवड असल्याने तसेच हा बंगला जुना झालेला असल्याने हा बंगला पाडून त्याच्या जागी नवी आलिशान टोलेजंग इमारत बांधण्याच्या निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार या इमीरतीचे बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे. आलिया आणि रणबीरने त्यांच्या आवडीनुसार फ्लॅटचे डिझाईन केले असून त्यानुसार काम होत आहे याकडे दोघे जातीने लक्ष देत आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी हे दोघे कन्स्ट्रक्शन साईटवर गेले होते आणि त्यांनी कामाची पाहाणी केली.

जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रणबीर कपूर आणि आलिया इमारतीचे काम पाहायला जात असत. यावेळी या दोघांसोबत नीतू कपूरही होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीरच्या लग्नापूर्वी इमारत पूर्ण व्हावी असा प्रयत्न कपूर कुटुंबियांकडून केला जात आहे. अत्यंत आधुनिक अशा इक्विपमेंटने ही इमारत सजवली जाणार असून यात मिनी थिएटरपासून अनेक सोयी सुविधा तयार केल्या जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. परदेशातील आलिशान आणि आधुनिक घरांप्रमाणेच रणबीर आणि आलियाचा हा आशियाना तयार केला जात आहे.

ही बातमी पण वाचा : आई-मुलीची वेगळी कथा सांगण्यासाठी आलिया भट्ट आणि शेफाली शाह एकत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER