मुंबईत पाय ठेवताच कंगना होम क्वारंटाईन होईल, महापौरांची माहिती

Kishori Pednekar & Kangana Ranaut

मुंबई : मुंबई (Mumbai) शहराचा अपमान केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही येत्या ९ तारखेला मुंबईत परतणार येणार आहे. परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जातं. त्यानुसार कंगनालाही होम क्वारंटाईन केलं जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

येत्या बुधवारी कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. ICMR च्या मार्गदर्शक तत्वानुसार, परराज्याततून आलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्याचे नियम आहेत. मी प्रशासनाकडून माहिती घेतली. आज किंवा उद्यामध्ये काही नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल, अशी माहितीही किशोरी पेडणेकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER