नाणार प्रकल्पावरून पुन्हा रणकंदन ; शिवसेना आणि भाजप आमनेसामने

Vinayak Raut-Pramod Jathar

मुंबई :- रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प पुन्हा गाजतोय असे दिसते. नाणार प्रकल्पावरून पुन्हा शिवसेना (Shivsena) भाजपमध्ये रणकंदन पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि जठार यांच्यामध्ये नाणारवरून वादाची ठिणगी पडली आहे. राऊत यांनी प्रमोद जठार (Pramod Jathar) यांच्यावर दलालीचे आरोप केले आहे. त्यावर जठार यांनी हे रोप फेटाळून लावले असून आरोप सिद्ध न झाल्यास राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाविषयी बोलायचे झाल्यास हा प्रकल्प येऊ घातल्यापासून त्याला विरोधच होत गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार, सागवे, कात्रादेवी परिसरांत जगातील सर्वात मोठी रिफायनरी म्हणजे खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प येऊ घातला होता. प्रदूषण मंडळाच्या वर्गवारीनुसार हा अतिप्रदूषणकारी प्रकल्पांच्या वर्गवारीत येतो. त्यामुळे प्रकल्पाला विरोध होणे स्वाभाविक होते. ह्या प्रकल्पांसाठी १६००० एकर जमीन संपादित केली जाणार होती. २००७ मधेच पेट्रोकेमिकल पेट्रोलियम इन्व्हेस्टमेंट रिजन या नावाचे धोरण सरकारने मंजूर केले व त्यानुसार देशाचा गुजरात ते पश्चिम बंगाल असा संपूर्ण समुद्रकिनारा आरक्षित करण्यात आला. हा प्रकल्प त्या चौकटीचा एक भाग किंवा पहिले पाऊल होते.

नाणार रिफायनरीला ग्रीन रिफायनरी असे नाव देण्यात आले. नावातच फक्त हिरवेपणा .! बाकी प्रकल्पात काही पालापाचोळ्यावर प्रक्रिया करून तेल शुद्धीकरण केले जाणार नव्हते हे उघड आहे. भाजप सरकार भाषा व घोषणाबाजी मधे माहिर असल्याने ही बोलाचीच कढी रहाणार होती.

२०१७ पासून म्हणजे जमीन संपादनाच्या नोटिसा निघाल्यापासून ह्या प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध होत होता. नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समिती च्या बॅनरखाली आंदोलन संघटित झाले. त्याला पर्यावरणाच्या प्रश्नावर काम करणा-या अनेक अभ्यासकांनी देखील साथ दिली, त्या परिसरातून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांनी पाठिंबा दिला व आंदोलनाला बळ मिळत गेले. ही ताकद ओळखून शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी त्या आंदोलनास समर्थन दिले व आता हा प्रकल्प नाणार येथून हटवण्यात आंदोलनास यश आले आहे. मात्र या प्रकलापसाठीचा वाद आजही कायमच आहे. या प्रकल्पासाठी लागमारी जमीन हा वादाचा विषय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER