राम्या कृष्णन; वयाच्या १४ व्या वर्षी डेब्यू आणि श्रीदेवीच्या नाकारण्यावर मिळाली होती ‘शिवगामी’ची भूमिका

Ramya Krishnan

‘बाहुबली’ चित्रपटाच्या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाने पात्रांना संस्मरणीय केले. मग ते महेंद्र बाहुबली, कटप्पा, शिवगामी किंवा देवसेना असो. सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिका इतक्या सजीवपणे बजावल्या की वास्तविक जीवनातही लोक त्यांना त्याच नावाने हाक देऊ लागले. अशीच एक भूमिका होती ती राजमाता शिवगामीची. हिंदी चित्रपट रसिकांसाठी शिवगामी बनणारी राम्या कृष्णन (Ramya Krishnan) जरी नवीन नव्हती परंतु या भूमिकेमुळे तिने प्रचंड वाहवाही घेतली. राम्या कृष्णनने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या.

राम्या कृष्णन यांचा जन्म १५ सप्टेंबर १९७० रोजी चेन्नई येथे झाला होता. वयाच्या १४ व्या वर्षी राम्या यांनी ‘वेल्लाई मनसू’ (१९८४) मध्ये तामिळ चित्रपटातून डेब्यू केला. ‘बाहुबली’मध्ये राम्या रागिष्ट आणि रौद्र रूपात पाहायला मिळाली. राम्या यांच्या आधीच्या चित्रपटांकडे पहात असताना ती ग्लॅमरस आणि बोल्ड शैलीत दिसल्या.

दक्षिण फिल्म इंडस्ट्रीनंतर राम्या बॉलिवूडमध्ये दाखल झाले. १९९३ मध्ये त्यांनी यश चोप्राच्या ‘परंपरा’ या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर राम्या यांनी सुभाष घईच्या ‘खलनायक’, महेश भट्टच्या ‘चाहत’ आणि डेव्हिड धवनच्या ‘बनारसी बाबू’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ मध्ये भूमिका केल्या.

‘बाहुबली’ हा चित्रपट राम्या यांच्या करियरसाठी मैलाचा दगड ठरला. काही लोकांनाच हे माहित असेल की श्रीदेवीशी यापूर्वी शिवगामीच्या भूमिकेसाठी बोलले गेले होते, परंतु जास्त फी मागितल्यामुळे दिग्दर्शक राजामौली यांनी राम्याला साइन केले. अहवालानुसार श्रीदेवीने या भूमिकेसाठी सहा कोटी मागितले होते. तसेच, श्रीदेवीने तिच्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलचे संपूर्ण फ्लोर बुक करण्यास सांगितले होते. चित्रपटाचे बजेट आधीच खूप जास्त होते. अशा परिस्थितीत राजामौलीला राम्या कृष्णन यांना साइन करणं बरं वाटलं.

राम्या कृष्णन यांनी आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त राम्या दक्षिण टीव्ही वाहिनीवरही कार्यरत आहे. वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना त्यांनी १२ जून २००३ रोजी तेलगू चित्रपट दिग्दर्शक कृष्णा वामसीशी लग्न केले. त्यांना ऋत्विक नावाचा एक मुलगा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER