रामराजे निंबाळकर फलटणचा राजवाडा कोरोना रुग्णांसाठी देणार

Ramraje Nimbalkar will donate Phaltan palace

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यासह फलटण तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या वाढत आहे. त्यामुळे विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्या घराण्याने लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुस्थितीत असलेला फलटणचा मुधोजी मनमोहन वाडा आणि विक्रम विलास हा बंगला कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी देण्याची घोषणा केली.

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाने आता खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मार्केट कमिटीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना पत्र लिहून शहरामधील कोरोना बाधित रुग्णांसाठी मुधोजी मनमोहन राजवाडा तर ग्रामिण भागातील रुग्णांसाठी सोनगाव येथील राहता बंगलाही जनतेसाठी उघडून देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तालुक्यात दुर्दैवाने जर कोरोना पेशंट वाढले, हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत असतील राजवडा आणि बंगला कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खुला केला जाईल, असे निंबाळकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER