रामगोपाल वर्माही या महिन्यात घेऊन येणार ‘डी कंपनी’

d company-Ramgopal Varma

मुंबईचे अंडरवर्ल्ड हा बॉलिवूडमधील (Bollywood news) बहुतेक सगळ्या निर्मात्यांचा अत्यंत आवडीचा विषय. त्यामुळे या विषयावर आतापर्यंत शेकडो सिनेमे आलेले आहेत. यात आघाडीवर आहेत संजय गुप्ता (Sanjay Gupta) आणि रामगोपाल वर्मा. (Ramgopal Varma) रामगोपाल वर्माने बॉलिवूडमध्ये सुरुवात ‘शिवा’ सिनेमाने केली होती. एक साधारण तरुण ‘भाई’ कसा बनतो ते त्याने या सिनेमात दाखवले होते. नागार्जुन (Nagarjuna) अभिनीत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. या सिनेमामुळे साउथचा सुपरस्टार नागार्जुनने नाव देशभर झाले होते. त्यानंतर रामूने ‘सत्या’सारखा सुपरहिट सिनेमा दिला होता. या सिनेमानंतर त्याने अंडरवर्ल्डवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांसमोर सादर केले. संजय गुप्तानेही असेच ‘शूटआउट अॅट वडाला’, ‘कांटे’, ‘आतिश’ असे काही सिनेमे तयार केले. आज या दोघांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या दोघांचेही या महिन्यात जे सिनेमे रिलीज होणार आहेत ते दोन्ही सिनेमे अंडरवर्ल्डवर आधारित आहेत.

संजय गुप्ताने ‘मुंबई सागा’त मुंबईच्या अंडरवर्ल्डची कथा सादर केली असून यात जॉन अब्राहम (John Abraham), इमरान हाशमी, सुनील शेट्टी असे अनेक कलाकार आहेत. हा सिनेमा 19 मार्च रोजी देशभरात रिलीज केला जाणार आहे. मात्र लगेचच पुढील आठवड्यात रामगोपाल वर्माही त्याचा नवा सिनेमा ‘डी कंपनी’ प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. खरे तर रामूच्या या सिनेमाबाबत कोणालाही कसलीही माहिती नव्हती. त्याने या सिनेमाबाबत कसली वाच्यताही केली नव्हती. पण आता ‘मुंबई सागा’ची चर्चा सुरु झाल्यानंतर त्याने ‘डी कंपनी’च्या रिलीजची घोषणा केली आहे. रामूने त्याच्या या नव्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर केला असून तो 26 मार्च रोजी त्याचा हा सिनेमा रिलीज करणार आहे. ट्रेलर पाहाताना सिनेमात सगळे नवीन कलाकार असल्याचे दिसत आहे.

हॉरर आणि अंडरवर्ल्डची आवड असलेल्या रामगोपाल वर्माने त्याचा नवा हॉरर सिनेमा ’12ओ क्लॉक’ नुकताच रिलीज केला होता. मिथुन चक्रवर्ती अभिनीत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता. आणि आता रामू त्याचा ‘डी कंपनी’ घेऊन येत आहे. ‘डी कंपनी’त संजय गुप्ताच्या ‘मुंबई सागा’ची झलक दिसत असल्याचे रामगोपाल वर्माशी बोलताना म्हणताच, त्याने म्हटले की, ‘डी कंपनी’ हाच खरा मुंबई सागा आहे. पुढे त्याने म्हटले, ‘मुंबई सागा’त काय दाखवले आहे त्याची मला माहिती नाही. अंडरवर्ल्डवर मी आतापर्यंत अनेक सिनेमे तयार केले आहेत. पण अजूनही अशा अनेक कथा आहेत त्या पडद्यावर आणता येऊ शकतील. माझा हा सिनेमा अंडरवर्ल्डचे खरे रूप दाखवणारा आहे असेही त्याने म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER