केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल रुग्णालयात दाखल; बारावीच्या परीक्षेचा निर्णय आता पंतप्रधान घेणार?

Ramesh Pokhriyal-PM Modi

नवी दिल्ली :- केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता बारावी परीक्षांसदर्भात होणारी घोषणा लांबण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडूनच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

आज दिल्लीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ही बैठक घेणार आहेत. ही बैठक आज होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारावीची परीक्षा कशी घ्यायची, याबाबतच्या पर्यायांवर सर्व राज्यातील शिक्षणमंत्री आणि तज्ज्ञांशी चर्चा करतील. या बैठकीत काही महत्वाचा निर्णय घेणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यादरम्यान दोन टप्प्यात बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याची शक्यता आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार CBSE २४ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान परीक्षांचे आयोजन करू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button