
हैदराबाद : रमेश कुमार यांना पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त नेमा, असा आदेश आंध्रप्रदेशच्या उच्च न्यायालयाने जगमोहन रेड्डी सरकारला दिला. सोबतच रेड्डी सरकारने तामिळनाडूचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. कानगराजू यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी केलेली नियुक्तीही रद्द ठरवली. हा राज्य सरकारला मोठा धक्का आहे.
कारण असे की, निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी जगमोहन रेड्डी सरकारची भूमिका होती; पण कोरोनाची साथ लक्षात घेता निवडणूक आयुक्त रमेश कुमार यांनी या निवडणुका सहा आठवडे तहकूब केल्या होत्या. यानंतर सरकारने रमेश कुमार यांना निवडणूक आयुक्ताच्या पदावरून हटवले व निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ पाचवरून तीन वर्षांचा करण्यासाठी पंचायत राज कायद्यात सुधारणा करण्याचा अध्यादेश काढला, तोही नाकारला गेला आहे. कानगराज यांनी ११ एप्रिलला निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला