रमीझ राजा यांनी उडवली आपल्याच संघाची खिल्ली, म्हणाले, यात तर आम्ही माहीर!

Maharashtra Today

पाकिस्तानने (Pakistan) दक्षिणआफ्रिकेविरुध्दचा (South Africa) पहिला वन डे (ODI).सामना ज्या पध्दतीने सहज जिंकता येणाऱ्या स्थितीतून अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत लांबवला आणि अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला ते पाहाता माजी कसोटीपटू व पाकिस्तानचे यशस्वी फलंदाज रमीझ राजा (Rameez Raja) यांनी आपल्याच संघाची खिल्ली उडवली आहे. पाकिस्तान संघाच्या या स्वतःला संकटात ढकलण्याच्या वृत्तीबद्दल त्यांनी म्हटलेय की यात तर आम्ही माहिर आहोत. साध्यासोप्या स्थितीतून संकटात कसे यायचे हे आम्हाला चांगले जमते. म्हणूनच जगभरात आमची मागणी आहे. सामना रंगतदार कसा बनवायचा हे आम्हाला चांगले माहित आहे.

या सामन्यात पाकिस्तानला 274 धावांचे लक्ष्य होते. त्याचा पाठलाग करताना शतकवीर बाबर आझम (Babar Azam). फलंदाजी करताना ते अगदी सहज जिंकतील असे वाटत होते. बाबर आझम 103 धावांची खेळी करुन बाद झाला तेंव्हा पाकिस्तानला 18 षटकात 88 धावांची गरज होती आणि आठ गडी हाताशी होते. म्हणजे षटकामागे पाचपेक्षाही कमीच्या धावगतीने त्यांना धावा करायच्या होत्या.

हीच लय त्यांनी पुढेसुध्दा कायम राखली. त्यामुळे अखेरच्या 18 चेंडूत 19 धावा आणि पाच गडी हाताशी हे समीकरण असताना पाकिस्तान काही चेंडू शिल्लक राखून, कदाचित एखादे षटक शिल्लक राखून सामना जिंकेल असेच वाटत होते पण 48 व्या षटकात फक्त पाच धावा निघाल्या आणि मोहम्मद रिझवान 40 धावांवर बाद झाला. पुढच्या षटकात 12 चेंडूत 14 धावा हव्या असताना एन्जीडीच्या गोलंदाजीवर शादाब खानचा झेल सुटला. त्यानंतर त्याने शादाबचा थेट त्रिफळा उडवला पण दुर्देवाने तो नो बॉल होता आणि जखमेवर मीठ म्हणजे फ्री हिटवर शादाबने चौकार लगावला.याप्रकारे या नाट्यमय षटकात 11 धावा निघाल्याने अखेरच्या सहा चेंडूत फक्त तीनच धावांची गरज होती. फेलुक्वायोने पहिल्याच चेंडूवर शादाबची (33 धावा) विकेट काढली. पुढचे तीन चेंडू निर्धाव गेले. त्यामूळे दोन चेंडूवर तीन धावा असे समीकरण बनले. त्यावेळी फहीमने दोन धावा घेत पाकिस्तान किमान सामना हारणार नाही हे निश्चित केले आणि सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर फहीमनेच विजयी धाव घेऊन पाकिस्तानचा 3 गडी राखून विजय साजरा केला.

लगेच प्रतिक्रिया उमटली की हे पाकिस्तान क्रिकेट आहे. पाकिस्तानचा सामना असताना तुम्हाला थरारक सिनेमे पहायची गरज नाही. प्रेक्षक मैदानात असोत वा नसोत, त्यांना त्यांच्या पैशांचा व वेळेचा पुरेपूर मोबदला कसा मिळेल हे आम्ही बघतो.

ही उपरोधिक टीका होत असली तरी पाकिस्तानी संघाने त्यांच्या शेवटच्या 10 पैकी 9 वन डे सामने जिंकले आहेत आणि एक सामना जो गमावला तोसुध्दा ‘टाय’ झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये गमावला होता. एप्रिल 2005 नंतर पाकिस्तानी संघाने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला.त्यावेळी भारताविरुध्द इंझमामने विजयी चौकार लगावला होता. शुक्रवारी फहिमने अखेरच्या चेंडूवर विजयी धाव घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button