अ‌ॅलोपॅथी’बद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत रामदेव बाबांनी व्यक्त केली दिलगिरी

नवी दिल्ली :- ‘अ‌ॅलोपॅथी (Allopathy) उपचारपद्धती हा मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी’ असल्याचे म्हटल्याबद्दल योगगुरु बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी खेद व्यक्त केला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत बाबा रामदेव याना लिहिलेल्या पत्रानंतर त्यांनी ‘वक्तव्य मागे घेत असल्याचे’ ट्विटरवर जाहीर केले.

आपले वक्तव्य माघारी घेत बाबा रामदेव यांनी परिपक्वतेचे उदाहरण दिले, अशी प्रतिक्रिया डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. हा बाबा रामदेव यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचा संकेत मानला जातो आहे.

याबाबत डॉ. हर्षवर्धन यांना बाबा रामदेव यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘माननीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनजी तुमचं पत्र मिळाले. उपचारपद्धतीवर निर्माण झालेल्या वादाला खेदपूर्वक विराम देत मी माझे वक्तव्य परत घेतो.’

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button