मी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचा अध्यक्ष : रामदास आठवले

Donald Trump - Ramdas Athawale

कोल्हापूर : रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आपल्या धमाल चारोळ्यांसाठी आणि आगळ्यावेगळ्या वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत. लोकसभेत भाषण करताना चारोळीचा उपयोग करून सभागृहाची ते वेळोवेळी दादही घेतात.

आज मंगळवारी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टिप्पणी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. ते दोन दिवसांपासून भारताच्या दौर्‍यावर आहेत, तर रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष अहेत.

आज माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे!