काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेणार नंतर राज्य सरकार पाडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा

Mahavikas Aghadi - Ramdas Athawale

इंदापूर :- शिवसेना (Shiv Sena) , राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) हे तीन पक्ष एकत्रित येत सरकार स्थापन केले . विधान परिषद निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर महाविकास आघाडी जोमात असल्याचे दिसून येत आहे मात्र भाजप आणि मित्रपक्षांकडून मात्र सरकार लवकरच कोसळणार असल्याचा वारंवार दावा करण्यात येत आहे . केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार हे तीन पक्षांचे असून, त्यामध्ये काँग्रेस पक्षास योग्य सन्मान मिळत नाही, असे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पाडेल, असा दावा आठवले यांनी केला.

पुढील पंचवीस वर्ष महाआघाडी सत्तेवर राहण्याचा दावा करत असली तरी त्यांच्यामध्ये सर्व अलबेला नाही. त्यामुळे घोडा मैदान लांब नाही. हे सरकार पडले तर आमची सरकार बनवण्याची तयारी आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने त्यामध्ये राजकारण सुरू झाले असल्याचेही आठवले म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शरद पवार, राहुल गांधींसह विरोधीपक्षांचे  शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार ; शेतकऱ्यांच्या मांडणार  व्यथा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER