रामदास आठवलेंनी गृहमंत्र्यांना कोरोनावर मात करण्याच्या दिल्या अनोख्या शुभेच्छा

Ramdas Athawale & Anil Deshmukh

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. यानंतर सर्व नेत्यांनी त्यांना कोरोनावर मात करण्यासाठी सदिच्छा देत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अनिल देशमुखांना हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत.

“गृहमंत्री अनिल देशमुखजी आपण लवकर करावी कोरोनावर मात, गो कोरोना या घोषणेची राहील तुम्हाला साथ, कोरोनाने माझा केला होता पिच्छा, तेव्हा तुम्ही दिल्या होत्या मलाही शुभेच्छा, कारण तुम्ही आहात माझे चांगले मित्र, म्हणून मी आज रंगवितो शुभेच्छांचे शब्दचित्र,” असे ट्विट करत रामदास आठवले यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER