रेमडेसिवीरचा ‘गेम’डीसिवीर करू नका; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला इशारा

Ramdas-Athavale-and-Uddhav-Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात निर्माण झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या (Remedesivir injection) तुटवड्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज्यातील ठाकरे सरकारला (Thackeray Govt) इशारा दिला आहे. रेमडेसिवीरचा गेमडेसिवीर करू नका, असा टोला लगावत रामदास आठवले यांनी आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. रेमडेसिवीर इंजक्शनसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळणार आहेत. औषधे पुरवू नका, असे कुठलेही आदेश सरकार देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश झाकू शकत नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये असे आवाहनही त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button