रामदास आठवलेंना कोरोनाची लागण, अनेक जण संपर्कात आल्याची भीती

Ramdas Athawale - Corona Positive

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला आहे. सोमवारला केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल आज हाती आला असूनते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निषपन्न झाले आहे.

दरम्यान, कालच अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) यांनी त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आठवले यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेकजण आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रामदास आठवले याना खोकला आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांनी स्वतःहून कोरोनाची चाचणी करवून घेतली. आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आठवले यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER