ठाकरे सरकारच्या कामगिरीला जनता ‘एवढे’ गुण देतील- रामदास आठवले

Ramdas Athwale-CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीला १०० पैकी किती गुण द्याल, असा प्रश्न जनतेला विचारला जात आहे. महाविकास आघाडी सरकारला जनता केवळ ३० गुण देऊन नापास करेल, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने विरोधक सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडत आहेत.

अशात आता रामदास आठवले यांनीही टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारला ही जनताच १०० पैकी ३० गुण देऊन नापास करेल, अशी टीका त्यांनी केली आहे. आज महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

तसंच भाजपाच्या नेत्यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. आता रामदास आठवलेंनी तर या सरकारला जनताच नापास करेल, असे ट्विट  केले आहे. कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई; वीज बिल माफीवरून जनतेच्या डोळ्यांत केलेली धूळफेक; कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणी दिसलेली सूडबुद्धी  ही राज्य सरकारला  शोभणारी कामगिरी नाही. लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो; प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर द्यायचे असते.  त्यांना उलटपक्षी प्रश्न का विचारतो म्हणून जाब विचारायचा नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धुऊन पाठी लागणार अशी विरोधकांना धमकीची भाषा वापरणे ही भूमिका समर्थनीय नसून लोकशाहीला मारक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावरच मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी दिलेला निकाल राज्य सरकारला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. मनपाने केलेली कारवाई वैयक्तिक द्वेषातून झाल्याचा ठपका राज्य सरकारवर उच्च न्यायालयाने ठेवला आहे, असेही आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकारचा एक वर्षाचा प्रवास: ‘स्थगिती सरकार ते सूड घेणारे सरकार’ – मुनगंटीवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER