शिवसेना-भाजपने एकत्र येऊन पुन्हा सरकार बनवावे – रामदास आठवले

Ramdas Athawale

मुंबई : राज्यातील सध्याच्या घडामोडींवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. या कारणाने हे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावे. आपण मिळून सरकार बनवू असे.” असे आवाहनही आठवले यांनी केले .

बांधावरच्या घोषणेचं काय झालं? सांगा उद्धवजी सांगा! : देवेंद्र फडणवीस

राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची केलेली घोषणा फसवी निघाली आहे. केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए व एनपीआर कायद्याच्या बाबतीत बोलताना एनआरसी हा फक्त आसामपुरता लागू होता.

तो कोणत्याही राज्यात येणार नाही. त्यामुळे कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व धोक्यात येणार नाही. मात्र, काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण करत आहेत, असा आरोप आठवले यांनी केला. भाजप खासदार नारायण राणे यांनी ११ दिवसांत महाविकास आघाडी सरकार पडेल, या वक्तव्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, ११ नाही तर १५ दिवसांत सरकार पडेल; पण, महाविकास आघाडी सरकार फार दिवस चालेल, असे आपल्याला वाटत नाही. कारण, आघाडीमध्ये वैचारिक वाद आहेत. सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आणि भाजपने एकत्र यावे, आपण सरकार बनवू, असे वक्तव्य आठवले यांनी केले.