शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

अहमदनगर : प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापुरात बोलताना केला. त्यांच्या या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी प्रत्युत्तर दिले.

26 जानेवारीला दिल्लीतील हल्ला भाजपने (BJP) घडवून आणला यात तथ्य नाही. प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी आंदोलनाला परवानगी द्यायला नको होती मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली. त्यामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये कुणी आतंकवाद्यांनी शिरुन हल्ला केला. शरद पवार जुने जाणते आहेत. या प्रकणाची चौकशी व्हावी म्हणजे सत्य बाहेर येईल,असेही ते म्हणाले.

दरम्यान प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आमच्या असे लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे मोठं आणि तितकंच गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER