पक्षाची दोन प्रकरणे बाहेर आली, आता तिसऱ्या पक्षाची वेळ : रामदास आठवले

Ramdas Athawale

नांदेड :- सरकारमधील दोन पक्षातली प्रकरणं बाहेर आली आहेत, तिसऱ्या पक्षातील प्रकरण लवकरच बाहेर येईल, असा सूचक इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तसेच वनमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविषयी आठवले यांनी भाष्य केले.

तिसऱ्या पक्षातीलप्रकरण बाहेर

“राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार तीन पक्षांचे आहे. सध्या दोन पक्षातील प्रकरणे बाहेर आली आहेत. तिसऱ्या पक्षातील प्रकरणही लवकरच बाहेर येईल.” असा दावा रामदास आठवले यांनी केला. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडकल्यामुळे ते मवाळ झाले आहेत, अशी टीका राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवर वाद आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असेही आठवले म्हणाले.

अमिताभ-अक्षयकुमारला देणार संरक्षण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे चित्रीकरण करू देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र, आता रिपब्लिकन पक्षाने या वादात उडी घेतली. “नाना पटोले यांनी दिलेल्या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करतो. जर काँग्रेस पक्ष या सिने अभिनेत्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न करत असेल, तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे संरक्षण करेल. त्यांच्या चित्रपटाच्या चित्रिकरणाला बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे काम रिपब्लिकन पक्ष करेल.” अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती.

ही बातमी पण वाचा : गुजरातमध्ये एमआयएमला यश; महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष बनला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER