आठवलेंची मोठी रणनीती; माजी मुख्यमंत्री अजित जोगींचे चिरंजीव एनडीएत दाखल होणार

Ramdas Athawale - Amit Jogi

मुंबई : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अजित जोगी (Ajit Jogi) यांचे पुत्र आणि जनता काँग्रेस (Congress) छत्तीसगडचे अध्यक्ष अमित जोगी (Amit Jogi) यांनी आज मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत आठवलेंनी अमित जोगी यांना जनता काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी करण्याबाबत चर्चा केली.

आठवलेंनी जोगी यांना एनडीएमध्ये (NDA) सामील होण्याचं निमंत्रण दिलं. त्यावर जोगी यांनी अनुकूलता दाखवली आहे. लवकरच आठवलेंच्या उपस्थितीत जोग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीत जोगी यांच्या एनडीए प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आरपीआयकडून देण्यात आली.

यावेळी अमित जोगी म्हणाले, छत्तीसगडमध्ये अमित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगडचे 7 आमदार निवडून आले आहेत. छत्तीसगडमधील दलित जनतेला रामदास आठवले यांच्यासारख्या राष्ट्रीय नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे रामदास आठवले यांनी छत्तीसगडमध्येही वेळ द्यावा. रामदास आठवले यांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर दलित बहुजन जनतेत लोकप्रिय आहे. छत्तीसगडमधील दलित आदिवासी बहुजन समाजाला रामदास आठवले यांनी वेळ द्यावा. अमित जोगी यांच्या विनंतीवर रामदास आठवले यांनी जनता काँग्रेसला आरपीआयसोबत एकत्र काम करण्यासाठी एनडीएमध्ये येण्याचं आवाहन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER