… शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा – आठवलेंची मागणी

Ramdas Athawale

मुंबई :- जलयुक्त शिवारबाबत सुडापोटी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी करण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. चौकशी करायचीच असेल तर मग त्यावेळी मंत्रिमंडळात असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

ते म्हणाले की, राज्य सरकारने सुडापोटी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचा घाट घातला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुडाचे राजकारण करू नये.

धार्मिक स्थळं सुरू करण्याची आमची मागणी आहे. आम्ही त्यासाठी आंदोलनही केले. परंतु उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली आहेत. शिवसेना आज फडणवीस सरकारमध्ये असती तर ही वेळ नसती आली. शिवसेनेने कोणाच्याही दबावाला बळी पडू नये आणि त्यांनी सर्व धार्मिक स्थळं  उघडावीत. गरज पडली तर पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळं उघडावीत.

अकाळी झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार मदत करत नाही, अशी टीका करताना आठवले म्हणालेत – काँग्रेस सध्या कृषी विधेयकास विरोध करते आहे. ‘व्हर्च्युअल रॅली’ काढते आहे; परंतु पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईला तयार नाही! हे सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते, मग अजून का केला नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER