‘यंदा दीक्षाभूमी, चैत्यभूमीला येऊ नका !’ रामदास आठवलेंचे आंबेडकरी जनतेला आवाहन

Ramdas Athawale

मुंबई :- मागील सहा महिन्यांपासून कोरोना (Corona Crises) साथीच्या आजाराने राज्यासह संपूर्ण देशात थैमान घातले आहे. या रोगाचा नायनाट करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र आर्थिक चक्र पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य  सरकारने  मिशन बिगिन (Mission Begin) अंतर्गत काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.  असे असले तरी कोरोनाचे संकट गेलेले नाही. त्यामुळे या वर्षी सण, जयंती, उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावे असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीदेखील याच पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. दसऱ्याच्या दिवशी नागपुरातील दीक्षाभूमी आणि ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी दादरच्या चैत्यभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी येत असतात. परंतु, कोरोनाचा धोका व दादरमधील रुग्णसंख्या बघता  चैत्यभूमीला न येण्याचं आवाहन त्यांनी आंबेडकरी अनुयायांना केलं आहे.

तसेच गावोगावी असलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून वंदन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चार-पाच जणांना परवानगी द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी  केली आहे. दरवर्षी हजारो अनुयायी समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी सुमारे पाच – सहा किलोमीटर लांब रांगा लावतात. या वर्षी ऑनलाईन दर्शनाची सोय अधिकाऱ्यांनी करून द्यावी याबाबत रामदास आठवलेंनी आज चर्चादेखील केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER