पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क, १ जूनपासून आंदोलन; आठवलेंची सूचना

Ramdas Athawale

मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षण (Reservation in promotion) हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. त्यानुसार राज्य सरकारने त्वरित आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी केली. या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष येत्या १ जूनपासून राज्यभर आंदोलन करणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

पदोन्नतींमध्ये आरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. यासाठी १ जूनपासून आठवडाभर रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी सरकार म्हणत असले तरी मागसावर्गीयांच्या आरक्षणप्रश्नी या सरकारचा बुरखा फाटला आहे. आघाडी सरकार हे दलितविरोधी सरकार ठरले आहे. या आंदोलनात कोरोनाचे नियम पाळून गर्दी न करता आंदोलन करण्याच्या सूचना आठवले यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयास सरकारने १९ मे रोजी तूर्तास स्थगिती दिली. या निर्णयावरून राज्य सरकारवर टीका-टिप्पणी सुरू झाली. कर्मचार्‍यांच्या पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त जागा तात्पुरत्या भरण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. २५ मे २००४ च्या सेवा ज्येष्ठतेच्या स्थितीनुसार रिक्त जागा भरण्यात येतील, असे सरकारने म्हटले होते. आरक्षणाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल, असे राज्य सरकारने जीआरमध्ये म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button