रा्मदास आठवलेंची पत्रकार परिषद, पायल घोष म्हणाल्या मुंडे प्रकरणी गृहमंत्री अमित शहांकडे कारवाईची मागणी करणार

ramdas athawale&payal ghosh

नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ते राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर भाष्य केले. तसेच, यंदाच्या जनगणनेवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रामदास आठवले यांनी टीका करताना ट्रम्प यांनी अमेरिकेत गुंडगिरी करून आपल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव बदनाम केल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून राजकारण करत आहे. माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. तसेच 2021मध्ये देशात होणारी जनगणना जातीय आधारावर झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

धनंजय मुंडेंना सरकार पाठिशी घालतंय महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ठाकरे सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणातील सत्य सरकारने शोधलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत रिपब्लिकन नेत्या, अभिनेत्री पायल घोषही (Payal Ghosh) उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ही टीका केली. मुंडे प्रकरणात पोलिसांनी अजूनही एफआयआर दाखल केला नाही. एफआयआर दाखल न करणं चुकीचं आहे, असं अभिनेत्री पायल घोष यांनी सांगितलं. अनुराग काश्यप प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली नाही. मला अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं पायल यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER