पदोन्नती व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रामदास आठवले लवकरच पवारांच्या भेटीला

ramdas athawale - sharad pawar - Maharashtra Today

मुंबई : पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सक्रिय झाले आहेत. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र आंदोलन करेल, त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकारची जाबाबदारी असेल. यापुढे दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काची अडवणूक करू नका, त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा गर्भित इशारा आज रामदास आठवले यांनी दिला.

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे १ जून ते ७ जूनदरम्यान राज्यभर आंदोलन सप्ताह पाळण्यात आला. आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभर रिपब्लिकन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि आयोजक जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून करण्यात आला. यावेळी अभयाताई सोनवणे यांच्यासह रिपाइचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावले, दलित आदिवासी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण रोखण्यात आले आहे, यावरुन हे सरकार आरक्षण विरोधी सरकार असल्याचे वाटत आहे. या सरकारमध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा आहे का? हा अजेंडा शिवसेनेचा आहे की, राष्ट्रवादीचा याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button