रामदास आठवले पोहचले थेट कंगनाच्या घरी; आरपीआय कंगनाच्या पाठीशी

Kangana Ranaut - Ramdas Athawale

मुंबई : आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी कंगनाला (Kangana Ranaut) पाठींबा दर्शवल्यानंतर आठवले आज तेट कंगनाच्या घरी पोहचले. आरपीआय कंगनाच्या पुर्णपणे सोबत असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले आहे.

कंगनासोबतच्या भेटीनंतर रामदास आठवलेंनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत आठवलेंनी कंगना आणि त्यांच्यात काय चर्चा झाली हे सविस्तर सांगितले.

“रिपब्लिकन पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या पाठीशी आहेत. मुंबई ही सर्व पक्ष, सर्व जाती धर्म, सर्व भाषा, प्रांतातील लोकांची आणि सर्वांचीच आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. कंगनाला मुंबईत घाबरण्याची गरज नाही.

रामदास आठवलेंनी सांगितले की, कंगनाने त्यांना तिच्या कार्यालयाच्या तोडफोडीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, कंगनाने सांगितले की, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली. त्यात फर्निचरचं मोटं नुकसान झालं. फिल्ममधून कमावलेल्या पैशातून हे कार्यालय त्यांनी ऊभारल्याचे म्हणाल्या. त्यामुळे या कारवाईत जे नुकसान जाले ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी कंगना न्यायालयात जाणार असल्याचेही आठवलेंनी सांगितले असल्याचे बोलले.

तसेच, यासंबंधी कंगना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशीदेखील (Uddhav Thackeray) चर्चा करणार असल्याचेही आठवलेंनी सांगितले.

दरम्यान, सामनाच्या अग्रलेखावर बोलताना आठवले म्हणाले, “कंगना ड्रग्स घेत होती हे सामनात कसं छापलं,याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत आणि सामनावर केस व्हायला हवी,” असेही रामदास आठवले म्हणाले.

तसेच, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आपल्याला गर्व असल्याचे कंगना म्हणाल्याचे आठवलेंनी सांगितले. माझं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या घरी आलात. तुमचा आशिर्वाद असू द्या. तुम्ही हिमाचलमध्ये कधी आलात तर तिथे आदरातिथ्य करण्याचा मला संधी द्या.” असे कंगना आठवलेंच्या भेटीदरम्यान म्हणाली असल्याचे आठवलेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कंगनाच्या खार येथील घरी रामदास आठवलेंनी कंगनाची बेट घेतली. कंगना आणि रामदास आठवले यांच्यात दीड तास चर्चा झाली अशी माहिती आठवलेंनी माध्यमांना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER