रामदास आठवलेंनी दिली राज्यपालांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट

Ramdas Athavale - Governor - Maharashtra Today

मुंबई : जगभरात आज गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली. भगवान बुद्धांचे अहिंसा, शांती, करुणा व उपेक्षितांची सेवा हे संस्कार भारतीय समाजमनावर शतकानुशतके रुजले आहेत. कोरोनामुळे आज जग आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना भगवान बुद्धांची व्यापक समाजहिताची शिकवण विशेष प्रासंगिक असल्याचे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तर, रामदास आठवलेंनी राजदरबारी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन बुद्धमूर्ती सप्रेम भेट दिली. यावेळी पूज्य भिक्खू संघाला चीवरदान राज्यपालांच्या हस्ते करण्यात आल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले. आठवले यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भातील फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button