रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेले दुकान, अनिल परबांनी केली टिंगल

Anil Parab & Ramdas Atvle

मुंबई : महाराष्ट्रात पोलिसांवर दबाव आणून चुकीचे कलम लावले जात आहे. गुंडागर्दी करणे ही शिवसेनेची जुनी सवय आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केली. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब (Anil Parab) यांनी – रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेले दुकान आहे, या शब्दांत अनिल परब यांनी आठवले यांची टिंगल केली.

अभिनेत्री कंगना राणावत हिने काल राज्यपालांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले – कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर (POK) वाटत असेल तर तिने योग्य वाटत असेल तिथे राहावे. कंगनाने आपला बोरा- बिस्तर गुंडाळावा. मुंबईबद्दल वाईट बोललेले आम्ही ऐकून घेणार नाही.

रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी कंगनाची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेवर टीका करताना महाराष्ट्रात थेट राष्ट्रपती राजवटी लागू करण्याची मागणी केली.

दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगनाचे पाली हिल येथील कार्यालय तोडल्यानंतर तिला आता आणखी एक नोटीस देण्यात आली आहे. तिच्या खारघरमधील घराचे बांधकाम अवैध आहे, असे म्हटले आहे. कंगनाने फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी, १३ मार्च २०१८ रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिने फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER