रामदास आठवले यांनी पायल घोषसोबत घेतली राज्यपालांची भेट

Governor Bhagat Singh Koshyari - Ramdas Athawale - Payal Ghosh

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांना अटक करा, या मागणीसाठी अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) हिने आज महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांची भेट घेतली. भेटीनंतर पायलने सांगितले की, राज्यपालांनी आम्हाला सांगितले आहे की, या लढ्यात ते माझ्यासोबत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे पायलसोबत होते.

राज्यपालांकडे मी संरक्षणाची मागणी केली आहे, असे ती म्हणाली. अनुराग कश्यप याला लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी करताना ती म्हणाली की, बलात्काराचा आरोपी उघडपणे रस्त्यावर फिरतो आहे, म्हणून मला संरक्षण मिळाले पाहिजे. अभिनेत्रीने कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला.

अनुरागवर बलात्कारासंदर्भात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, अनुरागला अजून चौकशीसाठी बोलावलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER