औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास आरपीआयचा विरोध- रामदास आठवले

Ramdas Athawle

मुंबई : औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याची मागणी होत आहे. याच मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अधयक्ष रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील, असे रामदास आठवलेंनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. भाजपने औरंगाबादचं नाव बदलण्याची मागणी करत आहेत.

भाजप आणि मनसेनेही संभाजीनगर नाव करण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी पण वाचा : …पण घरातली उणीधुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER