रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार सोहळा २ जानेवारीला

सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती

Ramabai Ranade Award

नागपूर :- स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात मोलाची कामगीरी करणाऱ्या स्व. रमाबाई रानडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवासदन शिक्षणसंस्था, नागपूरच्या वतीने ९२व्या वर्धापनदिनानिमित्त ‘विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार’ वितरण सोहळा २ जानेवारीला सायंकाळी ५. ३० वाजता सेवासदन संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्ह्णून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थिती राहील, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली .

शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी सेवासदन संस्थेच्या वतीने दरवर्षी शिक्षण-प्रबोधन पुरस्काराचे आयोजन करण्यात येते . शाल , श्रीफळ आणि ५१ हजार रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून यंदाचा पुरस्कार सावनेरजवळील खापा बडेगाव मार्गवरील ‘ अभ्युद्य ग्लोबल व्हिलेज स्कूल’ चालविणारे सचिन व भाग्यश्री देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

ही बातमी पण वाचा : थंडीने गारठून नागपुरात दोघांचा मृत्यू

दरम्यान कार्यकमात संस्थेच्या स्मरणिकाचेही प्रकाशन होईल, अशी माहितीही कांचन गडकरी यांनी दिली . या पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष बापू भागवत, समितीच्या कार्याध्यक्षा वासंती भागवत , सहसचिव नाना आखरे , भगवंत भांगे , डॉ. कल्पना तिवारी उपाध्याय आदी उपस्थित होते .