रामविलास पासवान यांचे निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Ram Vilas Paswan

नवी दिल्ली :- लोक जनशक्ती पार्टीचे (एलजेपी) संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांचे नुकतेच दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत त्यांचे सुपुत्र चिराग पासवान यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

पासवान यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मागच्या शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या हृदयाचे ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र आज अचानक त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER