वडिलांना अशा परिस्थितीत सोडून बिहारला येणे शक्य नाही ; चिराग पासवान यांची कार्यकर्त्यांना भावनीक साद

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान दिल्लीत आयसीयूमध्ये

Ramvilas Paswan-Chirag Paswan

पाटणा: लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख केंद्रिय मंत्री रामविलास पासवान (Ramvilas Paswan) दिल्लीत आयसीयूमध्ये दाखल आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातच पूढे ऑक्टोबर महिन्यात बिहारच्या विधानसभा निवडणुका आहेत. मात्र, काहीही असले तरी वडीलांना अशा परिस्थितीत दिल्लीत सोडून बिहारला येणे शक्य नसल्याचे पासवान यांचे पुत्र आणि लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी पत्र लिहून कार्यकर्त्यांना भावनीक साद घातली आहे.

जवळच असणा-या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, अशा परिस्थितीत वडीलांना सोडून आपण येऊ शकत नसल्याचे चिराग पासवान यांनी पत्रातन कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

चिराग पासवान यांचे पत्र –

“कोरोना संक्रमण काळात लोकांना रेशन मिळण्यास त्रास होऊ नये, म्हणून वडिलांनी नियमित आरोग्य तपासणी पुढे ढकलली. यामुळे ते आजारी पडले. गेल्या तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात आहेत.” असे चिराग पासवान यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे

“मुलगा या नात्याने मी वडिलांना रुग्णालयात पाहून खूप अस्वस्थ होतो. वडिलांनी मला बर्‍याच वेळा पाटण्याला जाण्याचा सल्ला दिला, पण मुलगा म्हणून त्यांना आयसीयूमध्ये सोडून कुठेही जाणे शक्य नाही. आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, तेव्हा मी त्यांच्याबरोबर रहावे अन्यथा तुम्हा सर्वांचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वत:ला कधीही क्षमा करु शकणार नाही”

“पक्षाध्यक्ष या नात्याने आपल्याला त्या सहकाऱ्यांचीही चिंता आहे, ज्यांनी आपले जीवन ‘बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट’साठी समर्पित केले आहे. आघाडीतील मित्रपक्षांशी बिहारच्या भवितव्याविषयी किंवा जागावाटपाबद्दल आजपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही.” असे चिराग पासवान यांनी पत्रातून सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER