राम मंदिरासाठी सरकारकडून निधी घेणार नाही : महंत नृत्यगोपाल दास

Mahant Nritya Gopal Das

ग्वाल्हेर : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी सरकारकडून निधी घेणार नाही. जनतेच्या योगदानातून मंदिर बांधू, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे (ट्रस्ट) अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी सांगितले. मंदिराच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले आहे.

आमच्याबरोबर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री या नात्याने योगी आदित्यनाथदेखील आहेत. याशिवाय इतर राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, ज्यांना धार्मिक कार्यात रस आहे त्यांना मंदिराच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी बोलवणार आहोत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनादेखील बोलावू, असे त्यांनी सांगितले. महंत नृत्यगोपाल दास म्हणाले, सरकारसमोर अगोदरच अनेक समस्या आहेत, त्या मार्गी लावायच्या आहेत. आम्ही त्यांच्यावर अधिक भार टाकू शकत नाही.

सीएए, एनपीआरला पाठिंबा देऊ नका; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धवला सल्ला

सरकारकडून मंदिरासाठी पैसे घेणार नाही. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची (ट्रस्ट) स्थापना करण्यात आली आहे. दिल्लीत पार पडलेल्या ट्रस्टच्या पहिली बैठकीत महंत नृत्यगोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे. स्वामी गोविंद देवगिरी यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. भवन निर्माण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद मिश्रा यांना देण्यात आली आहे.