राम मंदिर : चांदीचे दान स्वीकारणे बंद, निधी द्या ! – आवाहन

Ram Mandir

अयोध्या : श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट गठित केल्यानंतर आतापर्यंत एक अब्ज रुपये रामललाच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. तब्बल दोन क्विंटल चांदीदेखील भक्तांनी रामललाचरणी अर्पण केली आहे. सध्या चांदीचे दान स्वीकारणे बंद असून भक्तांनी मंदिर निर्माणासाठी रोख रक्कम  द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कॅम्प कार्यालयाचे प्रभारी प्रकाशकुमार गुप्ता याबाबत म्हणाले की, “राम मंदिरासाठी दररोज मोठ्या प्रमाणात दान मिळते आहे. जवळजवळ एक अब्ज रुपयांचे दान मिळाले आहे. दोन क्विंटलपेक्षा जास्त चांदी दान स्वरूपात मिळाली आहे. त्यामुळे सध्या रामभक्तांकडून चांदीचं दान घेणं  बंद करण्यात आलं आहे. भक्त चांदीऐवजी रोख रक्कम दान करू शकतात. भक्तांकडून इतके दान मिळते आहे की राम मंदिरासाठी पैसे कमी पडणार नाहीत. ” नवरात्रौत्सवात राम मंदिर निर्माणाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

चाचणी म्हणून सुरू असलेले पायाभरणीचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. (Ayodhya ram temple) राम मंदिराच्या पायाभरणीत सुमारे १२०० खांबांचा वापर होणार आहे. त्यासाठी सुरुवातीला चार खांबांचा वापर करून पायाभरणीच्या कामाची चाचणी घेतली जाणार होती. ते काम पूर्ण झाले असून नवरात्रीपर्यंत त्याचा अहवाल समोर येईल. त्यानंतर लगेच पायाभरणीच्या मुख्य कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER