अयोध्येत भक्तिमय वातावरणात ऐतिहासिक राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न

Ram Temple Bhumi Pujan held in Ayodhya

अयोध्या :- ज्या ऐतिहासिक क्षणांची कोट्यवधी देशवासी, रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण आज पार पडला. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन (Ram Temple Bhumi Pujan) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपालदास हे उपस्थित होते. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुख्य पूजा पार पडली.

१२ वाजून ४४ मिनिटे ८ सेकंदांपासून १२ वाजून ४४ मिनिटे आणि ४० सेकंद हा ३२ सेकंदांच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. पायाभरणीसाठी, पाया खोदण्यासाठी चांदीचं फावडं वापरलं गेलं तर चांदीची वीट यावेळी ठेवण्यात आली. त्याआधी पंतप्रधानांनी पारिजातकाचं वृक्षारोपण केलं. हनुमानगढीत त्यांनी पूजा केली.

पंतप्रधानांनी हनुमानगढीत चांदीचा मुकुट अर्पण केला. अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मंत्रोच्चारात भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER