शरद पवारांच्या वक्तव्यामधून अहिल्याबाईंचा अपमान आणि नातवाविषयी प्रेम ; राम शिंदेंचा टोला

मुंबई : जेजुरीतील अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या पुतळ्याच्या अनावरण (statue Unveiling) प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) एका वक्तव्यावरुन भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे .

नातवाच्या प्रेमापोटी त्यांनी हे वक्तव्य केलंय. ज्या वक्तव्याने अहिल्यादेवींचा अपमान झाला. पवारांची ही गंभीर चूक आहे, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून जिथून राष्ट्रवादीचे रोहित पवार आमदार म्हणून विधानसभेवर जातात ज्या मतदारसंघातल्या चौंडीला अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला”, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.

अहिल्याबाईंच्या जन्माचं ठिकाण सांगण्याकरिता त्यांनी रोहित पवारांचे आणि त्यांच्या मतदारसंघाचे नाव घेण्याची खरंच गरज होती का? असा सवाल विचारत त्यांच्या याच वक्तव्यावर धनगर समाजातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यावरून पवारांची ही गंभीर चूक आहे. त्यांच्या बोलण्यातून अहिल्यादेवीपेक्षा नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आणि त्यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवीचा जन्म झाला आहे, असं सूच्त करणारं पवारांचं वक्तव्य होतं. जे अतिशय गंभीर होतं. पवारांची ही गंभीर चूक आहे.

मला वाटत शरद पवार हे राजकारणात आणि लोकशाहीतल अर्धशतक पूर्ण करणारे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या तोंडून हे वाक्य गेलेले आहे. ते अनावधानाने गेले असेल किंवा स्लिप ऑफ टर्न झाले असेल मात्र असे वक्तव्य करणे ही गंभीर बाब असून अवमान आहे, असे राम शिंदे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER