‘कुणाच्या आईने इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल’

 श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ( Kangana Ranaut) यांच्या सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अयोध्येते येऊ नये, असं अयोध्येतील संतांनी म्हटले होते . यावरून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यानू (Champat Rai Yanu) मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे .

कुणाच्या आईनं त्याला इतकं दूध पाजलंय की तो उद्धव ठाकरेंचा सामना करेल आणि तेदेखील अयोध्येत… कुणाच्या आईनं इतके जिरे खावून इतक्या शक्तीशाली मुलाला जन्म दिलाय की तो गंगेला रोखू शकेल, असं म्हणत चंपत राय यांनी ठाकरेंना अयोध्यते येण्यासाठी विरोध करणाऱ्यांना आव्हान दिले .

दरम्यान, कंगणा राणावतचं कार्यालयावर मुंबई महापालिकेने हातोडा मारण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये अशी घोषणा केली होती. जर ते आलेच तर त्यांचे स्वागत होणार नाहीच पण त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागेल, असं म्हणत विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER