राम मंदिर फक्त मंदिर-मशिदीचा वाद नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- ज्या लोकांना वाटते की, अयोध्येच्या राम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) वाद केवळ मंदिर आणि मशिदीचा वाद आहे, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, अयोध्येत भूमी कमी होती का? मशीद बांधण्यासाठी दुसरी जागा नव्हती का? असा प्रश्न भाजपाचे (BJP) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते माधव भंडारी यांच्या ‘अयोध्या’ (Ayodhya) या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते .

फडणवीस म्हणालेत, बाबराचा सेनापती मीर बाकी याला मशीद बांधण्यासाठी जिथे रामलल्ला विराजमान होते, जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता तीच भूमी का दिसली असेल? कारण, एखाद्या समाजाला पराजित मानसिकतेत न्यायचे असेल तर त्या समाजाचा आत्मा मारावा लागतो. जेव्हा त्या समाजाचा आत्मा मरतो तेव्हा तो पराजित मानसिकतेत जाऊन गुलाम होतो.

अतिशय समृद्ध संस्कृती लाभलेल्या या भारताला मिटवण्यासाठी या संस्कृतीचा आत्मा असलेल्या श्रीरामाचे मंदिर उद्ध्वस्त करून त्यांना एक संकेत द्यायचा होता की, तुमचा आत्मा आम्ही नष्ट करू शकतो, आमची शक्ती बघा. तुमचे प्रभू श्रीरामदेखील तुम्हाला आमच्यापासून वाचवू शकत नाहीत. अशा प्रकारचा संकेत देऊन त्यावेळी घाला घातला गेला. म्हणून हा केवळ मंदिर आणि मशिदीचा प्रश्न नव्हता, असे ते म्हणाले.

कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही, शिवसेनेला (Shiv Sena) टोमणा

संजय राऊत यांनी राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यावर टीका केली होती. यावर नाव न घेता शिवसेनेला टोमणा मारताना फडणवीस म्हणालेत, विश्व हिंदू परिषद आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून राम मंदिर उभे करायचे आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. राम हे संपूर्ण समाजाचे आहेत. त्यांचे मंदिर वर्गणीतूनच बांधले जाईल. तुम्ही मदत द्या, तुमच्याकडेही वर्गणीसाठी पाठवू. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यावर टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER