न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर झळकली प्रभू श्रीराम आणि मंदिराची प्रतिमा

Newyork

नवी दिल्ली :- आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना आज संपूर्ण देश राममय झाला असल्याची भावना व्यक्त केली. पण हा आनंद फक्त भारतात साजरा करण्यात आला नाही. तर साता समुद्रापार अमेरिकेतही सेलिब्रेशन सुरु होतं. त्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये (Times Square) राम मंदिराचा डिजिटल बिलबोर्ड पाहायला मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत असतानाच न्यूयॉर्क शहरामधील टाइम्स स्क्वेअर येथे प्रभू श्रीराम आणि मंदिराची प्रतिमा झळकली. अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानंतर न्यूयॉर्कमधल्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर येथे प्रभ रामचंद्रांचं छायाचित्र झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र टाईम्स स्क्वेअरमधील बिलबोर्ड्सवरील जाहिरातीचं काम सांभाळणाऱ्या कंपनीनं यास नकार दिला होता. अमेरिकेतल्या मुस्लिमांनी या प्रकरणात विरोध दर्शवत मोहीम हाती घेतल्यानं जाहिरात कंपनीनं प्रभू रामाचे फोटो झळकण्यास असमर्थतता दर्शवली. मात्र आज अचानक टाईम्स स्क्वेअरमध्ये प्रभू रामचंद्र, अयोध्येतील राम मंदिर आणि भारताचा झेंडा फडकला. ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या भारतीयांना सुखद धक्का बसला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER