राम मंदिर भूमिपूजन : मंचावर मोदी, भागवतांसह केवळ ५ जणांना स्थान

Ram Temple- Mohan Bhagwat-PM Modi

अयोध्या : येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्यामध्ये होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाच्या (Ram Mandir Bhoomipujan) कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र ५ ऑगस्टला मुख्य भूमिपूजनाच्या दिवशी मंचावर केवळ ५ जणांना स्थान देण्यात आलं आहे. या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यासह केवळ चौघा जणांना स्थान देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अगदी काही लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यातही मुख्य मंचावर केवळ ५ व्यक्तींना स्थान मिळणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath), गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश आहे.

एकूणच कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय म्हणाले, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आम्ही १३५ संतांना आमंत्रित केलं आहे. यात देशातील ३६ परंपरांच्या१३५ संताचा समावेश आहे. याआधी काही प्रश्न उपस्थित झाले होते. संतानाही दलित म्हणण्यात आलं होतं. मात्र, संत हे संत असतात. देशाच्या भुगोलवरील प्रत्येकजण येथे असेल. आम्ही इक्बाल अंसारी यांना आमंत्रण दिलंय. फैजाबादच्या पद्मश्री महम्मद शरीफ यांनाही आमंत्रण दिलं आहे. आम्ही आमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. त्यावर सिक्युरिटी कोड छापण्यात आला आहे. याचा वापर एकदाच करता येईल. ज्याच्या नावाने पत्रिका आहे त्यांनाच याठिकाणी उपस्थित राहता येईल.

ही बातमी पण वाचा : भूमिपूजनाला पंतप्रधानांचे जाणे महत्वाचे, उद्धव ठाकरे कधीही जातील – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER