पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचे आश्वासन टोपे यांनी पाळले नाही- राम कुलकर्णी

Ram Kulkarni-Rajesh Tope.jpg

मुंबई : कोरोनाच्या (Corona virus) काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांना विम्याचे ५० लाख रुपये संरक्षण मिळवून देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी बुलडाणा येथे दिले होते;

पण यावर आजपर्यंत काहीही कारवाई झाली नाही, असा आरोप भाजपाचे (BJP) राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी केला.

कोरोनाच्या काळात राज्यात ३० पत्रकारांचा मृत्यू झाला. पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकाराच्या मृत्यूनंतर असे वाटले होते की, पत्रकारांच्या सुरक्षेबाबत सरकारला काही जाग येईल; पण तसे काही झाले नाही. रायकर यांचा मृत्यू हा सरकारच्या आरोग्य अव्यवस्थेचा बळी आहे. त्याला सरकारच जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे या मागणीसाठी पत्रकारांनी नुकतेच एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. सरकारला आठ हजार एसएमएस पाठवले. सरकारने पत्रकारांबाबत तरी खोटे बोलू नये, असे कुलकर्णी म्हणाले.

राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार असताना त्यांनी पत्रकार संरक्षण कायदा दिला. हे सरकार पत्रकारांना जेलमध्ये टाकते आहे ! फडणवीसांनी पत्रकारांना पेंशन दिली. या सरकारने पत्रकारांबाबत मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER