पी. व्ही. नरसिंहरावांचे ओएसडी राम खांडेकरांचे नागपुरात निधन

Maharashtra Today

नागपूर : महाराष्ट्राने आणखी एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे ओएसडी म्हणून काम पाहिलेले राम खांडेकर (Ram Khandekar) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात मुलगा मुकुल, सून संगीता आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. राम खांडेकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwant rao chavan) यांचे खासगी सचिव होते. १९९१ साली जेव्हा राव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर हे त्यांचे सर्वांत विश्वासार्ह मानले गेले होते. राजकारणाबरोबरच खांडेकर यांनी वृत्तपत्र व दिवाळी अंकांसाठी लेखन केले आहे. त्यांच्या शासकीय सेवेतील अनुभव त्यांनी पुस्तकाच्या स्वरूपात मांडले आहेत. २०१९ साली ‘सत्तेच्या पडछायेत’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले.

नरसिंहरावांसोबतची कारकीर्द
दोन असे नेते होऊन गेले ज्यांच्या काळात देशाला कलाटणी मिळाली. त्यापैकी एक नेहरू आणि दुसरे नरसिंहराव. इतर पंतप्रधानांची कारकीर्दही तेवढीच महत्त्वाची आहे. पण इतिहासात ह्या दोन नेत्यांच्या कारकिर्दीत देश बदलला. नरसिंहरावांच्याच काळात देशाने उदारीकरण स्वीकारले. अनेक ऐतिहासिक निर्णयांचे राम खांडेकर साक्षीदार होते. कारण नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी राम खांडेकर त्यांचेही काम पाहू लागले. ते नरसिंहरावांच्या सर्वांत जवळचे मानले गेले. त्यांच्या कारकिर्दीबद्दलही राम खांडेकरांनी विपुल लेखन केले आहे. आठवणी दाटतात, शापित नायकाची अखेर, राम मंदिर वाद आणि नरसिंह राव, सुधारणापर्व, सौजन्यशील नेतृत्व- असे काही खांडेकरांचे महत्त्वपूर्ण लेख नरसिहरावांबद्दलचे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button