कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणाऱ्यांचा सोशल मीडियावर सहा कोटी खर्च; राम कदमांचा अजितदादांना टोमणा

Ajit Pawar - Ram Kadam

मुंबई :- राष्ट्रवादीचे (NCP) नेते व उपमुख्यमंत्री (DCM) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यावर टीका करताना भाजपाचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी टीका करताना म्हटले – कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी (Social Media) सहा कोटी रुपये खर्च करायला निघाले आहे. ‘कोरोना लसीसाठी पैसे नाही म्हणणारे महावसुली सरकार सोशल मीडियासाठी सहा कोटी रुपये खर्च करायला निघाले आहे.

उपमुख्यमंत्र्यांसाठी सहा कोटी, तर अशा डझनभर मंत्र्यांसाठी किती पैसे खर्च केले जाणार आहेत. लोकांच्या घामाचा पैसा स्वतःची वाहवा करण्यासाठी वापरला जाणारा आहे. या सरकारची प्राथमिकता काय आहे? असा सवाल राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांचे ट्विट – कोरोना संकटामुळे उत्पन्नाचे स्रोत आटून राज्य सरकारला आर्थिक चणचण जाणवत आहे. तिजोरी रिकामी असल्यामुळे गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल सहा कोटी रुपयांचा दौलतजादा केल्याचे उघड झाले आहे.


Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button