जय श्रीराम म्हणायला लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा! – राम कदम

Ram Kadam on Uddhav Govt over support of Mamata Banerjee

मुंबई :- शिवसेनेने (Shivsena) बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. यावर भाजपाचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ‘ जय श्रीराम म्हणायला लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा’ अशी शिवसेनेवर टीका केली.

… औकात कळेल
बंगालच्या निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही? असा सवाल करताना शिवसेनेने बंगालच्या निवडणुकीत उतरावे म्हणजे त्यांना त्यांची औकात कळेल, अशी जहरी टीका राम कदम यांनी केली.

बिहारमध्ये एकाही जागेवर डिपॉझिट वाचले नाही
शिवसेनेने बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती; सर्व जागी त्यांचे डिपॉझिट जप्त झले. त्यातून धडा घेत बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला, असे कदम म्हणालेत.

संजय राऊतांचं ट्विट
शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. ममतादीदी बंगालची वाघीण आहेत, असे राऊत म्हणालेत.

त्यांनी ट्विट केले – “शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. सद्य:स्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश चिंततो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER